शाळेतली २६ जानेवारी. 🇮🇳
नवीन वर्ष चालू झाले कि ओढ लागायची ती २६ जानेवारीची. आमची सकाळची शाळा असायची आणि त्यात दातांवर दात आपटवणारी थंडी.चुलीपुढे बसून गरम-गरम चहा आणि पालेऀजीच बिस्कीट पोटात ढकलून शाळेचा युनिफॉर्म घालून सातच्या आत शाळेची घंटा वाजायच्या आधी कुठे अंगावर ऊन पडेल अशा जागेवर आलेल्या मैञीनी बरोबर उभं राहायचं.गुरूजी येईपर्यंत शाळेची सफाई करुन घेणे, पिण्याच्या पाण्याची टाकी कळशी भरुन ठेवणे अशी काम गटागटाने ठरलेल्या दिवशी उरकून घ्यायची.आणि मग राष्ट्रगीत,प्रार्थना, पंचांग वाचन ही व्हायचं हे सर्व शाळेच्या अंगनात व्हायंचं. साडे दहाला शाळा सुटायची मग घरी येऊन न्याहारी आंघोळ आणि आपल्या ला जमणारी काम आणि दुपारी २.३० ला शाळा भरायची तेव्हा पुन्हा दोनला घरून निघायचो. हा दिनक्रम. जानेवारीत रोज संध्याकाळी मधल्या सुट्टीनंतर कवायतीचा सराव चालू असायचा.खडी कवायत,बैठी कवायत, डंबेल कवायत ,कदमताल, लेझीम असे अनेक प्रकार करताना मजा यायची.आणि तो दिवस जवळ येताच नसानसांत एका वेगळ्या शक्तीचं आगमन व्हायचं आणि तो दिवस यायचा.कपडे स्वच्छं धुवून पितळेच्या जाड तांब्यात जळजळीत चुलीतले निखार...